जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थचा सुळसुळाट, बांगलादेशी नागरीकांना अटक आणि आता एका हॉटेलातील स्वयंपाक करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीकडे दोन गावठी पिस्तूलासह २ फायटर आणि तब्बल ४१ जिवंत काडतूस सापडले आहे.
रत्नागिरी (क्राईम टुडे न्यूज) । कोकणातील चिपळूण मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थचा सुळसुळाट, बांगलादेशी नागरीकांना अटक आणि आता एका हॉटेलातील स्वयंपाक करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीकडे दोन गावठी पिस्तूलासह २ फायटर आणि तब्बल ४१ जिवंत काडतूस सापडले आहे. चिपळूण पोलीसांनी ही कारवाई केली असून त्याला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. याप्रकराी नीरज सिंह हिरा बिस्त (वय २१) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात सावर्डे येथील दोन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. मुश्ताक शेख महंमद अतिआर शेख (वय-३७) रा. गांव पेडोली, पोस्ट पेडोली बाजार, जि. नडाई, ठाणा कालीया देश बांग्लादेश. मोहम्मद शाहीन गाझी (वय-२६) रा. सिध्दीबाशा, शुनातला बाजार, ठाणा ओबाईनगर जिल्हा जोशोर, देश बांग्लादेश यांना अटक केली आहे.