सेवानिवृत्त आरोग्य अधीक्षकाने घेतला टोकाचं पाऊल !, मुलाने पाहताच केला आक्रोश

गुन्हे जळगाव शहरे

महापालिकेत आरोग्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पहायला मिळाले

जळगाव (क्राईम टुडे न्युज) । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. प्रताप रामभाऊ चव्हाण (वय-६४) रा. लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, प्रताप चव्हाण हे सम्राट कॉलनीतील लक्ष्मीनगर येथे पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत वास्तव्याला होते. ते जळगाव महापालिकेतून आरोग्य अधिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले होते. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या पुर्वी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचा लहान मुलगा नितीन चव्हाण हा जेवणाचे ताट घेवून वरच्या खोलीत गेला.त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. नितीनने बराच वेळ आवाज दिला. परंतू आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, शेजारी राहणऱ्या नागरीकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता प्रताप चव्हाण यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी कुटुंबांनी एकच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *