Breaking News : कॅफे सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन जोडप्यांना रंगेहात पकडले

गुन्हे राज्य

कॅफे फूड सेंटर नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून पैसे घेऊन कॅफेत जागा कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले जात होते. पोलीसांनी धाड टाकून तीन महाविद्यालयीन जोडप्यांना रंगेहात पकडले आहे. 

 

जालना (क्राईम टूडे न्यूज) । शहरातील कॅफे फूड सेंटर नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले आहे. यात महाविद्यालयीन तीन जोडप्याना रंगेहात पकडून समज देवून सोडण्यात आले आहे. तर कॅफे मालकावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना शहरातील कॉफे फूड सेंटर नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून पैसे घेऊन कॅफेत जागा कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले जात होते. या अनुषंगाने जालना शहरातील मंठा चौफुली परिसरतील प्रीती सुधा नगर भागात असलेल्या कॅफे फूड ट्रेझर या कॉफी सेंटरमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ३ महाविद्यालयालयीन जोडप्यांना अश्लील चाळे करताना पकडले. पकडलेले तीन ही जोडपे हे महाविद्यालयीन तरुण – तरुणी असल्याचे समोरआले. या दुकानात कॉफी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुनच पोलिसांनी ही धाड टाकली.

या कॅफेचा चालक सुमित केसापूरे या ठिकाणी येणाऱ्या जोडप्याकडून एक तासाचे एका केबिन साठी २५० रुपये तर सोफा सेट रूमसाठी ५०० रुपये घेत असल्याची माहीती उघडकिस आली आहे. पोलिसांनी कॉफी शॉप मध्ये ३ जोडप्यांना रंगेहाथ पकडले असून त्यांना समाज देऊन सोडून देण्यात आले आहे.  या प्रकरणी कॅफे मालक सुमित केसापुरे याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती सदर बाजार पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *