कोहीनुर स्क्वेअर इमारतीच्या पार्कींगमध्ये मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जवळपास १६ ते १७ वाहने जळून खाक झाल्याचे समोर आले. दरम्यान कुणालाही सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.
मुंबई (क्राईम टूडे न्यूज) । मुंबई (mumbai dadar) तील दादरमधील कोहीनुर स्क्वेअर (Kohinoor Square) इमारतीच्या पार्कींगमध्ये सोमवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जवळपास १६ ते १७ वाहने जळून खाक झाल्याचे समोर आले. दरम्यान कुणालाही सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.
ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्यरात्री इमारतीला आग लागताच अग्निशमन दलाचे १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुदैवाने कुणालाही दुखपत किंवा जीवीतहानी झालेली नाही. कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेली कोहिनूर स्क्वेअर इमारत तशी वर्दळीच्या ठिकाणी आहे. दादर पश्चिमेत शिवसेना भवन समोरच असलेल्या कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री मोठी आग लागली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पार्किंग लॉट आहे. या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही मोठी आग लागली होती. कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या १६ ते १७ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. लागलेल्या आगीसंदर्भात स्थानिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, कंत्राटदारांकडून नियमांच उल्लंघन करून गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे ही आग लागली. आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.