पाचशे रूपयांच्या बनावट नोटा कमी दरात बाहेरून खरेदीकरून त्या खऱ्या भासवून चलणात आणणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई पैठण जिल्ह्यातील पाचोड पोलीसांनी केली आहे.
छत्रपती संभाजी नगर (क्राईम टूडे न्यूज ) : पाचशे रूपयांच्या बनावट नोटा कमी दरात बाहेरून खरेदीकरून त्या खऱ्या भासवून चलणात आणणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई पैठण जिल्ह्यातील पाचोड पोलीसांनी केली आहे. कारसह दोन जणांना अटक करण्यात यश आले आहे. कुंदन सुधाकर जगताप (वय-२५, रा.अंकुशनगर, महाकाळा ता. अंबड आणि सचिन मधुकर जाधव (ता.अंबड जि.जालना) असे अटकेतील संशयित आरोपीचे नावे असून एक फरार झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या सुत्रानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ५०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे समोर आले. दरम्यान या बनावट नोटा घेवून संशयित हा पाचोड परिसरात असल्याची गोपनिय माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून हॉटेल निसर्ग या ठिकाणी सोमवारी ६ नोव्हेबर रोजी रात्री साडे नऊ वाजता संशयित आरोपी कुंदन सुधाकर जगताप स्विफ्ट कार क्रमांक (एमएच ०४ जीएम २५५२) ही घेऊन जेवणासाठी थांबला होता. यावेळी पाचोड पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ५०० रूपयांचा १३ बनावट नोटा आढळून आल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ह्या नोटा संशयित आरोपी सचिन मधुकर जाधव (रा.शहगड, ता.अंबड जि. जालना याच्यांकडून ५ हजार रूपयांमध्ये विकत घेतल्याचे सांगितले.
यावरून पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक संतोष माने पोलीस, उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस नाईक फेरोज बर्डे, पोलीस नाईक चव्हाण, मधुकर जाधव यांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक करण्यात आली. दोघांकडून एकुण ४४ नोटा आणि कार असा एकुण ४ लाख ७५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.