जळगाव (क्राईम टुडे न्यूज) – जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंद्यान उत आले आहे. यावर कारवाई करावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात होती. या अनुषंगाने मंगळवारी सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी अचानकपणे शहरातील दोन ठिकाणी धडक कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले तर यातील एक फरार झाला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीसांनी केलेल्या दोन ठिकाणच्या कारवाईत एकूण ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष डेअरी आणि शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या सट्टा व मटका क्लब सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान पोलीस पथकांनी पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, नाना तवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, बालाजी बारी, मनोहर वानखेडे यांनी दोन्ही ठिकाणी छापा मारून संशयित आरोपी सचिन आनंदा जाधव, संजय भाऊलाल चौधरी आणि सखाराम भटू चौधरी या तिघांना ताब्यात घेतले तर राजू पाटील हा फरार झाला आहे. पोलीसांनी केलेल्या करवाईत ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सायंकाळी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.