कंपनीचे शटर उचकावून मशिनरीसह ६७ हजारांचे साहित्य लांबविले

गुन्हे जळगाव

एमआयडीसीतील कागद बनविणाऱ्या कंपनीतील पत्र्याच्या शेडमधून सुमारे ६७ हजार रूपये किंमतीचे मशिनरीसाठी लागणारे साहित्य व इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्याचे समोर आले आहे. 

 

जळगाव (क्राईम टुडे न्यूज) ।  एमआयडीसीतील कागद बनविणाऱ्या कंपनीतील पत्र्याच्या शेडमधून सुमारे ६७ हजार रूपये किंमतीचे मशिनरीसाठी लागणारे साहित्य व इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्याचे समोर आले आहे. चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

सिद्धार्थ अशोक अग्रवाल (वय-३२) रा. शिरसोली रोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसी मधील के-सेक्टरमध्ये कागद बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल तयार करण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान त्यांनी नवीनच पत्राचे शेड भाड्याने घेतले असून या शेडमध्ये युनिट उभारण्याचे काम सुरू आहे. या युनिट उभारण्यासाठी मशीनला लागणारे सामान इलेक्ट्रिक मोटार, ईलेक्ट्रीक पाण्याची मोटार, ब्रेकर मशीन आदी साहित्य आणून ठेवले होते. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शेडमध्ये सामान ठेवून शटरने बंद केले होते.  मध्यरात्री अज्ञात चोरट्यां या शेडमधून इलेक्ट्रिक मोटार,  पाण्याची मोटर, इलेक्ट्रिक केबल आणि काँक्रीट ब्रेकर्स असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. दरम्यान सिद्धार्थ अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *