परीक्षा सुरु अन् बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल…

गुन्हे ठळक बातम्या पाचोरा

आई वडीलांच निधन…मुलानेही अर्ध्यावरच आयुष्याचा डाव संपविल्याने वंशाचा दिवाच विझला

जळगाव (क्राईम ट्युडे टीम )- पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात बारावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजदत्ता नरेंद्र पवार (वय – १८) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. बारावीच्या परिक्षा सुरु असल्याने राजदत्ता याने त्याच्या मित्राला फोन करुन अभ्यास करण्यासाठी त्याच्या घरी बोलावले होते, मात्र मित्र पोहचण्यापूर्वी राजदत्ता याने जगाचा निरोप घेतला होता, मित्र घरी पोहचल्यावर तो घटना बघून सुन्नच झाला होता.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील साईनगरात राजदत्ता नरेंद्र पवार हा कुटुंबासह वास्तव्यास होता. राजदत्ता हा सोयगाव तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होता. सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असून २७ रोजी राजदत्तने फिजिक्सचा पेपर राजदत्ता याने दिला होता. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता हा घरीच होता. तर त्याची सावत्र आई माहेरच्या मंडळींसोबत रामेश्वर येथे देव दर्शनाला गेल्या आहेत. त्यामुळे राजदत्ता हा घरी एकटाच होता. सायंकाळी ५ वाजता राजदत्ता याने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ता यांचा मित्र ५ वाजेच्या सुमारास राजदत्ता याचे घरी आले असता राजदत्ता हा घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला, यात राजदत्ता हा घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला. यावेळी मित्रांनी एकच आक्रोश तसेच आरडाओरड करत राजदत्त यास पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत.

पवार कुटुंबियाचा वंशाचा दीवा विझला

राजदत्ता हा लहान असतांना त्याच्या आईचे हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात राजदत्ता याचे वडिल नरेंद्र पवार यांनी दुसरे लग्न केले. सर्व काही सुरळीत सुरु असतांना नियतीने डाव साधला. नरेंद्र पवार यांना देखील लिव्हर चा झडला व या आजाराने त्यांचे देखील दुर्दैवी निधन झाले आहे. राजदत्ता हा पवार कुटुंबियाचा एकुलता एक मुलगा होता, त्याला दोन बहिणी असून त्यातील एका बहिणीचे लग्न झाले असुन एक बहिण नाशिक येथे शिक्षण घेत आहे. आई वडील नसल्याने संपूर्ण जबाबदारी राजदत्ताच्या खांद्यावर आली होती, उच्च शिक्षित होवुन मोठ्या पदावर नौकरी मिळावी ही जिद्द उराशी बाळगून राजदत्ता हा शिक्षण घेत होता, नाशिक येथे खाजगी क्लासेस लावून तो बारावीच्या परीक्षा अभ्यास करुन परीक्षा देत होता. राजदत्ता याच्या मृत्यूने पवार कुटुंबियांचा वंशाचा दिवा विझला असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

#jalgaonnews#crimenews#12thexam#studentattemptsusaid#pachoranews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *