आईशी भांडण.. अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. जिथे पोहचली तिथे मुलीसोबत घडल भयंकर

गुन्हे जळगाव

जळगावातील १६ वर्षीय मुलीला सोडा पाजून अनैतिक कृत्य करण्याचा दबाव

महिनाभरात वेगवेगळ्या व्यक्तींनी केले अत्याचार

जळगाव (क्राईम टूडे)- आईचे भांडण झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर एका महिलेने तिला मदत करण्याच्या बहाण्याने चाळीसगावात सोडले. याठिकाणी तरुणीला सोडा पाजून तिला दाम्पत्याने पैशांसाठी वेगवेगळया लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास दबाव टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महिनाभरात या अल्पवयीन मुलीवर वेळोवळी एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केल्याचे अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ जानेवारी रोजी अल्पवयीन  मुलीचे तिच्याआईसोबत भांडण झाले, यादरम्यान अल्पवयीन आईला काही एक न सांगता घरातून निघून गेली,  यादरम्यान तिला जळगावात नितू उर्फ जोया राजू बागडे या नावाची महिला भेटली, जोया हिने ओळख करत अल्पवयीन मुलीला तिच्या घरी घेवून गेली, त्याठिकाणी अल्पवयीन पाच ते सहा दिवस राहिली. त्यानंतर काही दिवसांनी जोया हि अल्पवयीन मुलीला चाळीसगावात बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी घेवून जाण्याचा बहाणा करत स्पेशल रिक्षाने चाळीसगावात घेवून गेली, याठिकाणी जोया हिने ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांच्याकडे ठेवले, काही दिवस तिच्याकडून काम करुन घ्या, तुमच्या घरी राहू दया असे जोया हिने ज्योती व चंद्रकांत या दाम्पत्याला सांगितले. याठिकाणी अल्पवयीन मुलीने मी काही चुकीचे काम करणार नाही, मला घरी जायचे सांगितल्यावर जोया आणि ज्योती या दोघांनी मुलीला तुला रोज रात्री गिऱ्हाईकांडून भरपूर पैसे मिळतील, फक्त दोन तीन गिऱ्हाईक काढ अशी दमदाटी केली, व याठिकाणाहून जोया निघून गेली.

यादरम्यानच्या काळात ज्योती व तिचा पती चंद्रकांत या दोघांनी अल्पवयीन मुलीला सोडा पाजला, मुलीला चक्कर आले, यादरम्यान अज्ञात कुणीतरी इसम आला व त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, पोट दुखत असल्याचे मुलीने ज्योती हिला सांगितल्यावर सोडा पिल्यामुळे पोट दुखत असेल असे ज्योतीने मुलीला सांगितले, यादरम्यान वेळावेळी मुलीने मला जळगावला जायचे असे सांगितले, मात्र ज्योती व चंद्रकांत या दोघांनी मुलीला तुला मारुन टाकू, जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच या धमकीतून मुलीला त्यांचे घरी तसेच इतर हॉटेलवर घेवून जात तिला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. यापोटी ज्योती व चंद्रकांत यांनी प्रत्येकी गिऱ्हाईकाकडून ३ ते चार हजार रुपये घेतले, अशा पध्दतीने ज्योती व चंद्रकांत यांनी महिनाभर मुलीला धमकी देत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले.

6 फेब्रुवारी रोजी जळगावला जायचे सांगत, दाम्पत्याने तिला सोडा पाजून रेल्वेत बसून दिले, सोडा पिल्यावर मुलीला उमजले नाही, जेव्हा उठली तेव्हा ती ठाण्यात पोहचली होती, याठिकाणी तिला पोलिसांनी कल्याण येथील महिला व बाल कल्याण मंडळ येथे दाखल केले, मात्र याठिकाणी मुलीने भितीने तिच्यासोबत घडलेला प्रकार न सांगता आईसोबत भांडण झाल्याचे सांगीतले, त्यावेळी पोलिसांनी मुलीच्या आईला संपर्क साधत मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

10 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव येथील दाम्पत्य मुलीला घेण्यासाठी जळगावात आले. तुझे कपडे राहिले असून ते कपडे घेण्यासाठी परत चल असं म्हणत पुन्हा चाळीसगावात नेल. या ठिकाणी पुन्हा ज्योतीबाई ने अल्पाइन मुलीला सोडा पाजून तिच्याकडे रोज गिऱ्हाईक पाठवत शरीर संबंध ठेवण्याचे काम करून घेतले. याच दरम्यान 23 फेब्रुवारी पोलीस पोलीस येणार असल्याचे सांगत ज्योतिबा तिच्या पतीने मुलीला जळगाव जा असे सांगितले. त्यानुसार पण मुलगी ही जळगावात आली व तिने तिच्यासोबत महिनाभरात घडलेली सर्व हकीकत तिच्या आईला सांगितले. यानंतर आईसोबत पीडित मुलगीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले व या ठिकाणी घडल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. या तक्रारीनुसार शनिवारी नितू उर्फ जोया राजू बागडे, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *