तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना पोलिसांच्या ताब्यात ; जळगावात खळबळ

गुन्हे ठळक बातम्या राज्य

चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात हजेरीसाठी आले अन् पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता, यादरम्यान निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि.७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्यात काही दिवसांपूर्वीच पुण्यातील तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड प्रवीण चव्हाण यांचे नाव वाढविण्यात आले होते. या गुन्ह्यात याच गुन्ह्यात चव्हाण यांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

मविप्र संस्थेतील वादाच्या प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे येथील कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसांच्या पथकाने निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी संशयितांनी भोईटे यांच्या घरात अनिधिकृतपणे प्रवेश करीत दस्तऐवज दाखल करायचे आणि पोलीसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. तसेच त्यांच्या घरात सूरा ठेवून असा कट रचून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती देण्यात आल्याचं सांगण्यात आल् होत तसेच निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि.७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती.

भोईटे यांच्या या तक्रारीवरुन अ‍ॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली आहे. अर्थात, या प्रकरणात अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रविवारी चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्यात प्रवीण चव्हाण हे चाळीसगाव येथे आले असता शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव येथून चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले असून पोलिस त्यांची चौकशी करीत आहे

चाळीसगावात हजेरी देण्यासाठी आले अन् पोलिसांनी घेतले ताब्यात

चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना जामीन झाला आहे या गुन्ह्यात हजेरी देण्यासाठी ते चाळीसगाव पोलीस ठाण्यात आले होते आणि नेमकं याच दरम्यान जळगाव शहर पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेतल असल्याची माहिती मिळाली आहे.

 

#jalgaonnews#crimenews#advpravinchawan#jalgaonpolice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *