नोकरी लावून देण्याचे सांगून लुबाळणाऱ्या ठगाच्या नाशकात आवळल्या मुसक्या

गुन्हे जळगाव

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

जळगाव (क्राईम टूडे) । तरूणांना रेल्वेत नोकरी आमिष दाखवत पैसे घेवून दोन वर्षांपासून फरार असलेल्या ठगाच्या स्थानिक गुन्हे शाखेने नाशकातून मुसक्या आवळल्या आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

मुकुंद मोरे हा जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार असलेल्या तरूणांना हेरून रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत पैसे घेत होता. परंतू नोकरी न लागल्याने दिलेल्या व्यक्तीने पैशांचा तगादा लावल्याने मुकुंद मोरे याने धनादेश दिला. परंतू धनादेश देखील बाऊन्स झाला. या फसवणूकीच्या प्रकरणी मुकुंदच्या विरोधात सन २०२१ मध्ये एरंडोल पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुकुंद हा फरार झाला होता. दरम्यान, संशयित आरोपी हा नाशिक शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.त्यानुसार पथकाने कारवाई करण्यासाठी पथकाला नाशिकला रवाना केले. रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पथकाने नाशिक बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयित आरोपी मुंकुंद बापूर मोरे याला अटक केली. त्याला एरंडोल न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोहेकॉ संदीप पाटील, पो.ना. नंदलाल पाटील, भगवान पाटील, इश्वर पाटील, चालक भरत पाटील या पथकाने कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *