तब्बल अडीच तासानंतर अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण
पालघर (क्राईम टुडे टीम) :- पालघर मधील सहस्त्रपर्णा औद्योगिक क्षेत्रातील दोन कंपन्यांना रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपन्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.आगीचे कारण अस्पष्ट असून कंपनीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पालघर पूर्वेकडील नंडोरे- देवखोप नजीक असलेल्या सहस्त्रपणा औद्योगिक क्षेत्रातील आनंद इंजिनिअरिंग कंपनीला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले, ही आग इतकी भीषण होती की, कित्येक किलोमीटर दूर अंतरावरून धुराचे लोण दिसत होते. पाहता पाहता या कंपनीच्या शेजारी असलेल्या एचडी फूड्स अँड डेरी कॉर्पोरेशन आईस्क्रीम कंपनीत देखील ही आग पसरली व ही कंपनीसुद्धा आगीच्या भक्षस्थानी आली.
अडीच तासांच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
कंपनीला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व जवळपास दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी या दोन्ही कंपन्यांना लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. कंपनीला आग लागल्याचे समजताच कंपनीत काम करणारे कामगार कंपनी बाहेर पडल्याने सुदैवाने या भीषण जीवितहानी टळली. मात्र दोन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी आल्याने कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
#palgharnews#crimenews#fireinccident