धुळे (क्राईम टूडे न्यूज) ! अवैधरित्या दारु निर्मीत करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून धुळे शहरातील राजीव गांधी नगरात धुळे शहर पोलिसांनी अवैधरित्या दारु तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या राजीव गांधी नगरात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारूचा कारखाना सुरू होता, यासंदर्भात धुळे शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पोलिसांनी छापा मारत लाखो रुपयांचा अवैद्यरित्या दारू बनवण्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता त्यावेळेस अवैद्य रित्या दारू बनवणारे दोन आरोपी त्या ठिकाणाहून पसार होण्यात यशस्वी झाले, मात्र धुळे शहर पोलिसांना या पत्र्याच्या शेडमध्ये असलेला लाखो रुपयाचे अवैधरीत्या दारू बनवण्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
धुळे शहर पोलिसांनी अवैधरीत्या बनवण्यात येणाऱ्या बनावट दारूचा मोठा साठा यावेळी हस्तगत केला आहे. यात बनावट दारूच्या बाटल्यांचे भरलेले बॉक्स, मोठ्या प्रमाणात स्पिरिट, दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय ऊजे, मच्छिंद्र पाटील, हेमंत पाटील, कुंदन पटाईत, गुणवंत पाटील, निलेश पोतदार, प्रवीण पाटील, मनीष सोनगीरे यांच्या पथकाने ही कारवई केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी यावेळी दिली.