नांदगाव तालुक्याच्या जातेगाव येथे १५ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू
मनमाड (क्राईम ट्युडे टीम) :- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावात शाळेची प्रभातफेरी सुरु असतांना, या प्रभातफेरीत सहभागी १५ वर्षीय विद्यार्थीनींचा अचानक चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे घडली आहे. पूजा दादासाहेब वाघ वय १५ असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात पूजा दादासाहेब वाघ ही इयत्ता नववीमध्ये शिकत होती. २६ जानेवारी रोजी शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सालाबाद प्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान पूजा अचानक चक्कर येऊन पडली. तिला उपचारासाठी तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. परंतु पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी सांगत तिला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. नांदगावला जात असताना च वाटेतच पूजा ची प्राणजोत मावळली.
पूजा हिला जन्मापासूनच श्वासोस्वास घेण्यास त्रास होता, तिची तपासणी केली असता तिच्या फुफुसाला होल असल्याचे सांगितले होते, त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. अशी माहिती याबाबत पुजा हिच्या नातेवाईकांनी दिली. परंतु पूजााचे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच निधन झाले. गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पूजा वर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात त्यातून शक्य तितकी मदत पूजा हिच्या पालकांना मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. पूजाच्या अकाली मृत्यूने प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले
#manmadnews#crimenews#studentdaithinrepublicdayrally