स्वतःचा बंगला आणि चारचाकी पेटवून दिली ..तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (क्राईम ट्युडे टीम ) : रागाच्या भरात एका तरुणाने स्वतःचा बंगला आणि चारचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे हा प्रकार घडला आहे. शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवत बंगाला व कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. प्रज्योत तांबे असे तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई वडील वाजेवाडी मध्ये गेलेले होते. प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली एम एच १२ ए जि ९४१८ हि कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लावली. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीने पेट घेतल्याने चारही टायर , एचीच्या सिलेंडरचा स्फोट झाला, तर आग लावणारा युवक फरार झाला. यावेळी शेजारी असणाऱ्या नागरिकांनी व पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही वस्तू जळून खाक झाल्या.मात्र जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी त्याला तमाधमध्ये जाऊन प्रज्योत याला ताब्यात घेतले आहे मात्र, या घटनेने नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी करत काही वेळाने ही अग विझवली देखील. मात्र तरुणाने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.
#punenews#crimenews#firenews#carandbanglowdestoyed