भुसावळ, सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्क..नागरिक हादरले…

जळगाव ठळक बातम्या भुसावळ

काही घरांमध्ये भांड पडले..भितीने नागरिक काही वेळ घराबाहेर थांबून

जळगाव (क्राईम टूडे टीम)-  जिल्‍ह्यातील भुसावळ शहर परिसरात आणि सावदा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले. यामुळे नागरीकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घाबरवून जावू नये, योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी १० वाजून ३५ मिनिटांच्‍या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले. या भूकंपाच्या धक्कयाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल नोंदली गेली. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्‍के बसल्‍याचे नागरीकांनी सांगितले.

भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरातील इमारतीतील नागरीक बाहेर पडत आले. तर राहुल नगरातील काही घरांमध्‍ये भांडे खाली पडल्‍याची माहिती समोर आली आहे. केशरनगरमध्‍ये देखील दरवाजे हलत असल्‍याने नागरीक घाबरले होते. यामुळे घाबरून नागरीक बराच वेळ घराच्‍या बाहेर थांबून होते. ज्‍या भागात भांडे पडले होते, त्या नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहेत.

#jalgaonnews#erthquack#bhusawalandsawada#collcectorjalgaon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *