अंगावर डिझेल ओतून घेतले… पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
धुळे (क्राईम ट्युडे टीम): प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम सुरु असतांना असतांना दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून नागरिकांनी सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात घडली. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
धुळे शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या 35 ते 40 वर्षापासून राहत आहेत, ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती, मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर संबंधित नागरिकांनी घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या हिसकवन्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी यातील काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलन कर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आले आहे.
#dhulenews#crimenews#republicday#susaidattempt