क्रेडीट कार्ड अन् पर्सनल लोनची ऑफर…फोनवर बोलता बोलताच तरुणाचे बॅक खाते झाले रिकामे…

अमळनेर गुन्हे ठळक बातम्या शहरे

मंगरुळ येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी )- क्रेडीट कार्डच्या ऑफर तसेच पर्सनल लोनच्या बहाण्याने अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील वय २३ हा तरुण सद्यस्थितीत पुण्यातील हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. मिलिंद यास त्याच्या १८ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मिलिंद यास पर्सनल लोन तसेच क्रेडीट कार्डच्या वेगवेगळया ऑफरबद्दल माहिती देत मिलिंद याचा विश्वास संपादन केला. यादरम्यान ओटीपी पाठवून तो विचारला. ओटीपीच्या आधारावर संबंधितांनी मिलिंद याच्या बँक खात्यातील ७ लाख ६० एवढी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करुन घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर मिलिंद पाटील याने शुक्रवारी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

#jalgaonnews#cyberfroud#cybercrime#onlinefroud

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *