वाहतूक शाखेच्या साहित्यप्रदर्शनासह वाहतुकीचे नियमांचे चित्रप्रदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) – शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहातंर्गत शनिवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर वाहतूक शाखेचे साहित्याच्या प्रदर्शनासह वाहतुकीचे नियमांबाबतचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. याला नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर वाहतूक सप्ताह २०२३” चे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा पोलीस दला तर्फे वाहतुकीचे नियम, वाहतूक शाखेचे साहित्ये, व चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी भेट देणाऱ्या नागरिकांना साहित्यांची तसेच वाहतुकीच्या नियमांची चित्राच्या आधारे माहिती दिली. हे प्रदर्शन १७ जानेवारी रोजी पर्यंत सकाळी ८:०० ये रात्री ८:०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे , याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी केले आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, लीलाधर कानडे, विजयकुमार ठाकूरवाड, दिलीप भागवत, रामकुष्ण कुंभार, जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री सोनावणे तसेच इतर अधिकारी अमलदार, तसेच आर सर्व शालेय एस पी चे विद्यार्थी, एन सी सी चे विद्यार्थी, रिक्षा चालक व इतर मान्यवर हे उपस्थित होते.
#Jalgaonnews#jalgaontrafficpolice#jalgoanpolice#rastesurakshaabhiyan