- आधी दिले दोन्ही मुलांना विष…नंतर दाम्पत्यानेही संपविले जीवन
- कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
पुणे (क्राईम ट्युडे टीम)- शहरातील मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये दाम्पत्यासह त्यांच्या दोघा मुलांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक शुक्रवारी समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि आर्थिक नैराश्यातुन ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे दिपक थोटे, इंदू थोटे, मुलगा ऋषिकेश थोटे वय २१, मुलगी समीक्षा थोटे वय १७ अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.
थोटे कुटुंबीय मूळचे अमरावतीचे असून दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. मागील काही दिवसांपासून संबंधित दाम्पत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे पती पत्नी आर्थिक समस्याने मानसिक तणावाखाली होते. कौटुंबिक गरजा भागविताना त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा आणि मुलीला विषारी औषध पाजून नंतर पती- पत्नीने औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलीसानी वर्तविला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.
#punenews#crimenews#familyfourpeoplesusaid#mawalpolice