‘लकी ड्रॉ’मध्ये स्विफ्ट कार लागल्याचे कुपन पोस्टाने घरी आले.. दिलेल्या नंबरवर संपर्क करणे पडले महागात

गुन्हे जळगाव ठळक बातम्या

जळगाव (प्रतिनिधी)- ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून ‘लकी ड्रॉ’मध्ये तुम्हाला मारुती स्विफ्ट डीझायर गाडी लागल्याचे कुपन पोस्टाने घरी आले…या आमिषाला महिला बळी पडली. अन् तिची फसवणूक झाली आहे. जळगावातील नवीपेठेतील महिलेची 4 लाख 80 हजार 242 रुपयात फसवणूक झाली असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील नवीपेठेत गिता राजेश तिलकपुरे ह्या राहतात. नापतोल ऑनलाईन शॉपींग या कंपनीकडून मारुती स्विफ्ट डिझायर गाडी लकी ड्रॉ मधे लागल्याचे कुपन तिलकपुरे यांना पोस्टाने त्यांच्या राहत्या पत्त्यावर आले होते. या कुपनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यात नमुद केले होते. त्या क्रमांकावर तिलकपुरे यांनी संपर्क साधला.समोरील बोलणा-याने आपले नाव नितीनकुमार सिंग असे त्यांना सांगितले. आपण नापतोल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नितीनकुमार सिंग नामक व्यक्तीने तिलकपुरे यांना त्यांच्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर कंपनीचे बनावट नाव, लोगो, स्टॅंप असलेले मिनीस्ट्री ऑफ फायनान्सचे बनावट पत्र असे एक ना अनेक कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला. आपल्याला चारचाकी गाडी मिळणार या आमिषाला भुलून तिलकपुरे यांनी विविध चार्जेसच्या नावाखाली ‘फोन पे’ च्या माध्यमातून नितीनकुमार सिंग नामक व्यक्तीला वेळोवेळी एकुण ४ लाख ८० हजार २४२ रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिलकपुरे यांनी बुधवारी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करत आहेत.

#jalgaonnews#onlinefroud#cybercrime

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *