सार्वजनिक शौचालयाजवळ लघुशंका का करतो असे बोलणे जीवावर बेतले.. वादातून तरुणाचा खून.

गुन्हे ठळक बातम्या राज्य शहरे

धुळे (क्राईम टुडे टीम ) :– सार्वजनिक शौचालयाजवळ लघुशंका का करतो असे तरुणाला बोलणे एका जनाला जीवावर बेतले आहे. बोलण्याचा राग आल्याने वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना शिरपूर शहरात घडली आहे. रामभाऊ भगवान माळी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटेनंतर फरार झालेल्या संशयिताला पोलीसांनी एका तासात ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील ईदगाह नगर भागात काल रात्री ८:३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक शौचालय जवळ लघूशंका का करतो असे म्हटल्याचा राग आल्याने मनोज भगवान मराठे याने रामभाऊ भगवान माळी यांना हाताबुक्यांनी मारहाण करत पकडुन सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जोराने डोक्यावर आपटल्याने रामभाऊ माळी यांचा डोळ्याजवळ जबर मार लागल्याने मृत्यू झाला.

मनोज मराठे यांनी रामभाऊ माळी यांना जबर मारहाण केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. रामभाऊ माळी यांना नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रामभाऊ माळी यांना मृत घोषित केले. याबाबत संशयित आरोपी मनोज मराठे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करत शिरपूर पोलीसांनी मनोज मराठेला एका तासातच शहादा रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे. व पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

 

#Crime news#shirpurnews# murder case

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *