वाळूच्या ट्रॅक्टरवर तलाठी कारवाई करतात तेव्हा…

गुन्हे

जळगाव प्रतिनिधी । सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रोड वरून बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मेहरूण येथील तलाठी यांनी कारवाई केली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा निर्माण करून ट्रॅक्टर चालक वाळूचे ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल केलाय.

शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा शिवारात असलेल्या गिरणा पंपिंग रोडवरून मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर मेहरूण येथील तलाठी राजू कडू बाऱ्हे यांनी पकडले. वाळू वाहतुकी संदर्भात परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगून “तुम्हाला काय जे करायचे आहे, ते करा” असे म्हणून ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरचालक पसार झाला. या संदर्भात मेहरून तलाठी राजू बाऱ्हे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालक सागर उर्फ शहा जिजाबराव पाटील रा. वैजनाथ ता. एरंडोल जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *